आत्महत्येची धग…युवा शेतकऱ्याने घेतले विष

 

– कोलगावच्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येने हळहळ

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शिरावर असलेल्या लाखो रुपयाच्या कर्जापायी विष प्राशन करून जिवन संपविल्याची घटना मंगळवारच्या रात्री 8 वाजता घडली.

विशाल अरविंद अवताडे (32) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचेकडे केवळ तीन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा कसाबसा गाडा हाकायचा.नैसर्गिक संकटात जेमतेम उत्पादन कर्जाच्या खाईत लोटत असतांना मारेगाव येथील मध्यवर्ती बँकेचे 70 हजाराचे कर्ज व जवळपास 2 लाखाचे सावकारी कर्ज विशाल ला सातत्याने अस्वस्थ करीत असतांना त्याने प्रोफेक्स सुपर नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन करून ईहलोकाची यात्रा केली.

दरम्यान, घटनेच्या दिवशी त्याला पुढील उपचारार्थ मारेगाव वरून यवतमाळ हलविण्यात आले मात्र उपचारदरम्यान विशालचा श्वास कायमचा थांबला.अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येने गावात पुरती शोककळा पसरली आहे.

विशाल याचे पश्चात आई वडील व भाऊ आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment