शहरातील नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील एका नामांकित खाजगी शिक्षण संस्थेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाकडून जबर मारहाण केल्याची घटना काल शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी घडली. सदर घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यासह पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मारेगाव शहरात खाजगी शाळांचा तोरा वाजवीपेक्षा चांगलाच वर चढला आहे. पालकही विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा धागा गुंफत ह्या खाजगी शाळेकडे धाव घेत आहे. मात्र अनेक खाजगी शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना शून्य असल्याचे बोलले जात आहे. अशाच एका महापुरुषाच्या नावाने खाजगी शिक्षण संस्था चालविणाऱ्या शाळेत संताप जनक प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ह्याच शाळेत इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शाळेत खेळाची तासिका असल्यामुळे विद्यार्थ्यासह शिक्षक पटांगणात आले. यादरम्यान विद्यार्थी हासत असल्याचा राग अनावर झाल्याने सदर शिक्षकांनी विद्यार्थ्यास जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे सदर विद्यार्थी प्रचंड धास्तावलेला आहे.सर्व विद्यार्थ्यांसमोर सदरची घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाप्रती प्रचंड धास्ती निर्माण झाली.
त्यामुळे संस्थाचालकांनी शिक्षकांना महापुरुषाच्या शोर्याची गाथा समजून शिक्षकावर कारवाई करायची मागणी होत आहे.
आमच्या मुलाचे काही चुकले असेलही, परंतु शिक्षकांनी त्याला समजावून सांगणे अपेक्षित होते. एक वेळ शिक्षा केली तर मान्य, परंतु अशी जीवघेणी शिक्षा देणे योग्य नव्हे. याबाबत लवकरच पुढील निर्णय घेणार आहोत.
-पालक, मारेगाव
झालेल्या प्रकरणाची निःस्पृह चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास योग्य कारवाई करु
संस्थाचालक