आत्महत्येची धग… मारेगावच्या विद्यार्थिनीने चंद्रपुरात गळफास घेत केली आत्महत्या

 

सुसाईड नोट मध्ये ‘हे’ कारण लिहीत घेतला टोकाचा निर्णय 

– मृतक विद्यार्थिनी ‘नीट’ ची करीत होती तयारी 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील 17 वर्षीय विद्यार्थिनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची घटना बुधवारला संध्याकाळी सात वाजताचे दरम्यान उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सातत्याने आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्या युवक युवतीच्या निर्णयाने मारेगाव तालुका प्रभावित होत चिंतेचे सावट पसरत आहे.आत्महत्येच्या सातत्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.

 

प्रांजली यशवंत राजुरकर रा. गोंडबुरांडा (मारेगाव)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

 

प्रांजली ही चंद्रपूर येथील रामनगर जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात असलेल्या खासगी “इन्स्पायर” शिकवणी मध्ये ‘नीट’ ची तयारी करीत होती.आत्महत्येपूर्वी प्रांजली हिने सुसाईड नोट लिहीत “आई, बाबा सॉरी. मला अभ्यासाचे टेन्शन आले आहे. त्यामुळे मी जगाचा निरोप घेत आहे. अशा आशयाची चिठ्ठी लिहून तिने आत्महत्या केली. दरम्यान, तिच्या मोबाईलमध्ये आत्महत्येपूर्वीची चित्रफितही आढळून आली असल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

 

चंद्रपूर येथे शवविंच्छेदनानंतर मृतदेह गोंडबुरांडा येथे आणण्यात आला.वृत्त लिहीपर्यंत प्रांजली हिला अखेरचा निरोप देण्याची प्रक्रिया सुरु होती.मृतक प्रांजली हिच्या पश्चात आई वडील व एक लहान भाऊ आहे.

टीप : अनवधानाने यापूर्वी प्रकाशित झालेल्या वृत्तात छायाचित्र प्रकाशित झाले होते. या बद्दल विदर्भ टाईम्स दिलगिरी व्यक्त करीत आहे. सुधारीत वृत्तांतील फोटो हा ग्राह्य धरावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment