आरोग्यम धन संपदा…मारेगावात शनिवारला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

 

– लोढा सुपरस्पेशालीष्ट हॉस्पिटल चा पुढाकार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

धकाधकीच्या जीवनात अनेकांना वेगवेगळ्या आजाराने कवेत घेतले असून यावर निरोगी राहण्याची मात्रा म्हणून मारेगाव येथे येत्या 14 सप्टेंबर ला शनिवार स्थानिक लोढा हॉस्पिटल प्रांगणात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

वर्तमान स्थितीत मानवी कार्यशैली बदलत आरोग्याच्या समस्या दिवसागणिक फुगत आहे. अनेकांना अर्थव्यवस्थेमुळे उपचार करणे अवघड जात असतांना वणी उपविभागात सामाजिक दातृत्वाचे धनी असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या सुबक कल्पनेतून आरोग्य सुदृढीसाठी विशेष करून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यात मोफत आरोग्य तपासणी सह रोग निदान, इसीजी, रक्त तपासणी, बी. एम. डी. तपासणी करीत प्राथमिक औषधी वितरण करण्यात येणार आहे.

 

सातत्याने बळाविणाऱ्या आजारावर अंकुश लावण्यासाठी महाआरोग्य शिबिरात सहभाग दर्शवावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

 

डॉ.लोढा यांची विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी

 डॉ. लोढा वणी उपविभागात तन मन धनाच्या कार्यशैलीने झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणून जनसामान्यात आपली ओळख अधोरेखित केली.ग्रामिण भागातील पांदन रस्ते असो किव्हा एखादी गंभीर रुग्ण. त्यांचे दायित्व स्वीकारण्यात डॉ. लोढा यांचे कार्य नियमित अग्रेषित आहे. किंबहुना आपल्या सरल व मृदू भाषेने सर्वांना आपलेसे करणारे डॉ. लोढा यांनी ग्रामिण भागात विशाल जाळे विणले आहे. याच जनतेच्या आशीर्वादाने आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यास तत्पर असून वरिष्ठ कार्यकारिणीकडे आपल्या जन कार्याचा व उमेदवारीचा प्रस्ताव सकारात्मक असल्याचे सुतोवाच “विदर्भ टाईम्स” शी बोलतांना डॉ. महेंद्र लोढा यांनी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment