पावसाचा प्रकोप… मुसळधार पावसाने दोन घरे जमीनदोस्त

 

घोडदरा येथील घटनेत लाखाचे नुकसान 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची पुरती भंबेरी उडत शहरासह ग्रामीण भागातील घरात पाणी शिरले. तालुक्यातील घोडदरा येथील दोन घरांची पडझड होत जमीनदोस्त झाल्याने किमान लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

 

 

मारेगाव तालुक्यात शनिवार च्या रात्री मुसळधार पाऊस जलदगतीचा वारा व विजेच्या कडकडाने सर्वसामान्य जनतेची पुरती तारांबळ उडाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 

तालुक्यातील घोडदरा येथील विवेक शंकरराव नरवाडे व नत्थू वामन गाथाडे यांचे घरे अतिपावसाने जमीनदोस्त झाली आहे. यात नरवाडे यांचे 80 हजार तर गाथाडे यांचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले.आधीच आर्थिक विवंचना असतांना नैसर्गिक प्रकोपाने अख्ख कुटुंब उघड्यावर पडले आहे.

 

प्रशासनाने दखल घेवून तात्काळ आर्थिक सहाय्य करण्याची तसदी घ्यावी अशी मागणी पिडीतांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment