– तोंडाला काळ्या फिती लावून सरकारचा निषेध
– फास्ट ट्रॅक खटला चालवून आरोपीला फाशी द्या
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
बदलापूर येथील दोन शाळकरी विद्यार्थिनींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीवर जलदगतीचा खटला चालवून फाशीवर चढवा व राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचारांवर अंकुश लावावा आदी मागण्या घेवून मारेगाव तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारला आंदोलन केले.आंदोलनात काळ्या फिती तोंडाला बांधून सरकारच्या बेताल भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार ) पार्टी, शिवसेना (उबाठा ) या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या घटनेची तीव्रता लक्षात घेता स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतरच ही घटना उजागर झाली.अमानुष अत्याचार केलेल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी जलदगतीचा खटला चालविण्यात यावा.महिलांच्या सुरक्षतेची काळजी सरकारने गांभीर्याने घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शन, निषेध व्यक्त करीत करण्यात आली.
याप्रसंगी माजी महिला बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, मारोती गौरकार, अभय चौधरी, नरेंद्र ठाकरे, खालिद पटेल, उदय रायपुरे, सुनिल गेडाम, आकाश बदकी यांचेसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.