– सकाळी घटना उघडकीस : कारण अस्पष्ट
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील बुरांडा येथील वीस वर्षीय युवकाने गळफास लावत जीवनाचा अखेर केल्याची दुर्देवी घटना आज रविवारला सकाळी सहा वाजता उघडकीस आली.
गोपीनाथ राजू धुळे रा. बुरांडा (ख.) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
राज्य महामार्गांवर असलेल्या पुलाच्या कठड्याला जवळपास दहा फुटाच्या दोरीने त्याने गळफास घेतला. सकाळी सहा वाजता घटना उघडकीस आल्याने बुरांडा येथे हळहळ व्यक्त होत आहे.
होतकरू आणि मिस्त्री काम करून जीवन जगणाऱ्या गोपीनाथ याने टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अस्पस्ट आहे.
मृतकाच्या पश्चात आई,वडील, भाऊ आहे.