– ‘लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज’ या विषयावर पुष्प गुंफणार
– साहित्यिक दशरथ मडावी यांची प्रमुख उपस्थिती
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, प्रसिद्ध विचारवंत प्रा. शाम मानव यांचे मारेगावात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी यांची प्रमुख उपस्थिती. माजी महिला बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.
स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात उद्या दि.19 आँगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता “लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज” या संवेदनशील विषयावर प्रसिद्ध विचारवंत, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. शाम मानव हे व्याख्यान करणार आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, भाकप चे जिल्हाध्यक्ष अनिल हेपट, सभापती गौरीशंकर खुराणा, माजी जि. प. सदस्य अनिल देरकर, संजय आवारी, अनंता मांडवकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, राष्ट्रवादी (श. प. गट )पार्टीचे तालुका अध्यक्ष भारत मत्ते, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, भाकप जिल्हा सरचिटणीस बंडू गोलर,प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, संचालक उदय रायपुरे, लहू जीवतोडे, होमदेव कनाके, संजय पोल्हे, रामभाऊ जिड्डेवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तालुक्यातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या आणि परिवर्तनवादी जनतेंनी सदरील व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.