आश्वासनाचा फुगा हवेत विरला.. मारेगाव बसस्थानकासाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार

 

– भाकप चा सातत्याने लढा

– आंदोलनाच्या दणक्याने प्रशासनाने निविदा काढली 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

प्रवाशांसह मारेगावकरांसाठी संवेदनशील व जटील बनलेल्या बसस्थानक प्रश्नासाठी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसत आमरण उपोषण सुरु केले. परिणामी, गत महिन्यात लोकप्रतिनिधीकरवी 15 आँगस्ट रोजी रीतसर बांधकाम उदघाटनाचा मुहूर्त हवेत विरल्याने मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न तळ्यात की मळ्यात?या बाबत सांशंकता निर्माण होत आहे.

 

गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानक प्रकरण चिघळत असतांना प्रवाशांचे बेहाल बघून भाकप चे वतीने सातत्याने आंदोलन छेडण्यात येत आहे. गेल्या महिन्यात बिगर शेती धारकांनी नियोजित जागेवर आंदोलन केल्यानंतर लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 15 आँगस्ट 2024 रोजी उदघाटन करून बांधकामाला सुरुवात करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र प्रशासनाच्या कासवगतीने हे काम रेंगाळत आश्वासनाचा बलून हवेत विरला.

 

दरम्यान, बसस्थानक झालेच पाहिजे यासाठी भाकप ने सुरुवातीपासून आंदोलनाची धग कायम ठेवून उपोषणाचे पुन्हा हत्यार उपसले. आंदोलनाचे वरिष्ठ प्रशासनास निवेदन देताच पुन्हा प्रशासन खडबडून जागे होत पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाने मारेगाव बसस्थानक बांधकामाची निविदा काढली आहे.मात्र, अधिकृत बांधकाम केव्हा सुरु होईल? याबाबत सर्वच अनभिज्ञ आहे.

 

परिणामी, प्रवाश्यांच्या मूलभूत गरजेसाठी आणि मारेगावचा तोडका विकासात्मक दृष्टीकोन ठेवून भाकप चे जिल्हाध्यक्ष बंडू गोलर यांनी तहसील कार्यालया समोर दि.13 आँगस्ट पासून आमरण उपोषण सुरु केले असून आंदोलनात त्यांचे समवेत कॉ. लता रामटेके, कॉ. रंजना टेकाम आहेत. आता बसस्थानक नेमके केव्हा होईल? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment