विदारक…  भोई समाजाचा घरकुल निधी लालफितीत अडकला

 

 – निधीसाठी राष्ट्रवादी अध्यक्ष पचारे व जिल्हाध्यक्ष कामारकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीत समाजाची विदारक व्यथा केली कथन 

 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

आम्हा मंत्र्यासारखे, अधिकाऱ्यांसारखे टुबदार बंगले नको.मायबाप सरकारनं किमान निवाऱ्यासाठी मूलभूत हक्काचं घर द्यावं.शासनाच्या विविध योजनेपासून कोसो दूर असलेल्या समाजाची तब्बल 45 वर्षांपासून ही मागणी आवासून उभी असतांना वणी विधानसभा अध्यक्ष सचिन पचारे यांनी थेट घरकुल निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटीत भोई समाजाची विदारक व्यथा व आपबिती कथन केली.

 

मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पायथ्याशी वसलेलं कोसारा गाव. सन 1979 साली महापुरात कोसारा गावाचं पुनर्वसन झालंय.येथे मासेमारी समाजाची संख्या अग्रणी असतांना हा समाज शासकीय योजनेपासून कोसो दूर आहे.

दरम्यान, शासनाच्या यशवंतराव चव्हाण वयक्तिक घरकुल योजने अंतर्गत येथील समाजाने प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दाखल केले. डिसेंबर 2023 मध्ये जिल्हा समितीच्या सभेत मान्यताही देण्यात आली. नव्हेतर, हा जिल्हास्थळावरील प्रस्ताव मंत्रालयात सरकविण्यात आला मात्र घरकुलसाठी निधीच उपलब्ध नसल्याने येथील घरकुल लाभार्थी वंचित असल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, इतर मागासवर्गीयामध्ये महाराष्ट्रात लाखो लाभार्थ्यात घरकुलचा प्रश्न मार्गी लागला मात्र हा समाज अल्पसंख्याक मध्ये मोडत असल्याने स्वातंत्र्यापासून शासनाच्या विविधांगी योजनेपासून वंचित असल्याची समाजाची ओरड आहे.

 

परिणामी, याबाबत वणी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अ. प. गट ) अध्यक्ष सचिन पचारे यांचेसह यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची भेट घेत साकडे घातले.पवार यांनी या प्रस्तावाची तातडीने दखल घेत मंत्रालयातील सदर विभागाला हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची सूचना केल्याने या समाजाच्या काही प्रमाणात आशा पल्लवीत झाल्या आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment