नागपंचमी विशेष… हजारो सापांना जीवनदान देणारा मारेगावचा सर्पमित्र आनंद गव्हाणे

 

– युट्युब व गुगल वरून घेतले प्रशिक्षण 

मारेगाव : दीपक डोहणे

बारावी पर्यंत शिक्षण. मिळेल ते काम करून कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा.मोबाईल वरील गेम खेळण्यापेक्षा त्याने साप पकडण्याचे ज्ञान अवगत केले.यातून त्याला सापांची दुनिया अनोखी वाटली.वेगवेगळ्या प्रजातीचे साप. त्याचे चालणे, फणा काढणे, कात टाकणे यातून त्याला आकर्षण वाढू लागले अन त्याने दोन वर्षांपासून बहुतांश ठिकाणी स्टिक सोडून विषारी – बिनविषारी साप अलगद पकडत तब्बल हजार वरील सापांना अधिवासात सोडून जीवनदान देणारा मारेगावचा अवलिया अवघा 22 वर्षीय युवक आनंद रामाजी गव्हाणे हा सर्पमित्र. आज नागपंचमी दिनानिमित्त सर्पमित्र ह्याचा “विदर्भ टाईम्स” ने घेतलेला परामर्ष.

 

अलीकडे मोबाईल मध्ये नको ते पाहत वेडे झालेल्या युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आनंद ने सापा विषयी ज्ञान अवगत करीत युट्युब व गुगल वरून वेगवेगळ्या रंगाचे व जातींच्या सापांचा अभ्यास केला. आजतागायत आनंद याने प्रशिक्षण घेतले नसले तरी महाराष्ट्रातील मन्यार, घोणस, पूरसे, गव्हाळ्या आदी साप विषारी असल्याचे सांगतो. यातील अजूनपर्यंत पुरसे नामक जातीचा साप निदर्शनास आला नसून इतर सर्व जातीचे साप पकडण्याची त्याने मजल मारली आहे.

 

विविधांगी प्रजातीच्या सापाबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहे.मात्र आनंद यातून अपवाद ठरत असतांना सापाचे जीवन अद्भुत आहे.त्याचा कोणत्याही सापावर जिव्हाळा लागतो.त्याने दोन वर्षाच्या कारकिर्दीत किमान हजार वरील विषारी व बिनविषारी सापांना जीवनदान दिले आहे.

सापावरील वेगवेगळ्या रचना, रंग, अरुंद, लांब सापा बाबत त्याचे आकर्षण वाढले आहे.यातच तो प्रसंगा नुसार वरिष्ठ सर्प मित्राचे मार्गदर्शनही घेत असतो.गोठ्यात, शेतात, घरात, कार्यालय, विहीर आदी ठिकाणी आढळणाऱ्या सापांना पकडून वन अधिवासात सोडतो.अनेक लोक साप दिसला की त्या मागे धावत जात त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र आनंदला काही लोकांची ही भूमिका आवडली नसल्याने त्याने सापाला जीवनदान देण्याचा चंग बांधला आणि दोन वर्षांपूर्वी पासून सर्पमित्र म्हणून त्याची साप पकडण्याची यात्रा सुरु झाली.

 

कुठेही साप निघाल्यास वेळ न दवडता तो त्या ठिकाणी पोहचतो.रात्र असो, पाऊस असो की दिवस असो तो सापाला जीवनदान देतोय.मात्र यातून तो निस्वार्थी सेवा करतो आहे.

 

मारेगाव तालुक्यासह इतरही तालुक्यातील जवळपास 100 गावातील सापांना जीवनदान दिलेला मारेगाव प्रभाग 4 मधील वास्तव्यात असलेला आनंद शहरात कुतूहलाचा विषय ठरतो आहे.सापाबद्दल भ्रमीत झालेल्या नागरिकांना नागपंचमी दिना निमित्त सर्पमित्र आनंद रामाजी गव्हाणे मो.नं.9767838542 यास प्रसंगा नुसार संपर्क साधण्याचे आवाहन “विटा न्युज नेटवर्क” कडून करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment