आगामी विधानसभा निवडणूक.. मारेगाव तालुक्यात दोन मतदान केंद्रांची वाढ

 

• नऊ केंद्राचे मतदारांच्या सोयीसाठी विभाजन

 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

 

तालुक्यात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीकोणातून मतदारांच्या सोयीसाठी दोन केंद्रात वाढ करण्यात आहे. तर सहा केंद्रात मागणी नुसार विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना आता मतदान करणे पूर्वी पेक्षा जवळ सोयीचे होणार आहे.

 

तालुक्यातील कांही गावातील मतदारांना मतदान केंद्रावर पाच ते सात किमी चे अंतर पार करुण मतदान करायला जावे लागत होते. त्यामुळे मतदान करायला जाणे गैरसोयीचे होत असल्याने याचा परिणाम मतदानावर होत असे.त्यामुळे कमी अंतरावर मतदान केंद्र द्यावे अशी मागणी मतदारांनी केली होती.

 

याबाबत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका कांग्रेस चे अध्यक्ष मारोती गौरकार, शिवसेना (उबाठा गट) जिल्हा संघटक डीमन टोंगे, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट आदीनी तहसीलदार मारेगांव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघा चे उत्तम निलावाड यांचेकडे मागणी केली होती.

 

लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या कडून आलेल्या सूचनाचा आणि मतदारांचा विचार करुन मा.श्री नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी वणी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 76 वणी विधानसभा मतदारसंघ यांचे मार्गदर्शनखाली तहसीलदार मारेगांव यांनी खैरगाव बुटी आणि मेंढणी या गावात नवीन मतदान केंद्राचे प्रस्ताव तयार करून सादर केले आहेत त्यास राज्य निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोग यांनी मंजुरी दिली आहे. तर नरसाळा येथील दोन केंद्रा पैकी घोडदरा येथे एक केंद्र देण्यात आले आहे. मच्छिद्रा येथील दोन केंद्रा पैकी एक ‘डोलडोंगरगाव, गौराळा येथील दोन केंद्रा पैकी एक वरुड, नवरगाव येथील दोन केंद्रा पैकी एक टाकरखेडा, बुरांडा ख येथील दोन केंद्रा पैकी एक हटवांजरी,तर सिंधी (म) येथील दोन केंद्रा पैकी एक केंद्र महागाव येथे स्थलातरीत करण्यात आले आहे.

 

तर दापोराचे मतदार बोरी बु येथून काढून चिंचमंडळ येथे, खापरीचे मतदार करणवाडी केंद्रातून काढून बुरांडा ख येथे तर आवळगाव येथील मतदार जळका येथून काढून खैरगाव भेदी येथील मतदान केंद्रात जोडण्यात आले आहे.नव्या बदलाची मतदारांनी नोंद घ्यावी असे आव्हान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघ उत्तम निलावाड यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment