ब्रेकिंग… जखमी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला

 

बोटोणीतील जुन्या रिठ जवळील नाल्यात आला निदर्शनास

बोटोणी : सुनिल उताणे 

बोटोणी जंगल परिसरातील पट्टेदार वाघ येथील जुन्या रिठ लगत असलेल्या नाल्याजवळ आज सोमवार ला सकाळी मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

 

मारेगाव तालुक्यातील खंडणी बोटोणी परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात उन्हाळभर वाघाचा वावर नव्हता. मात्र या पट्टेदार वाघाणे बाहेरून काही दिवसापूर्वी प्रवेश केला. तशा आशयाचा ट्रॅप कॅमेरात वनविभागास हा वाघ निदर्शनास आला. त्यांच्या मानेलगत जखम असल्याची माहिती वनविभाग सूत्रांकडून मिळाली.

 

परिणामी, वाघाची जखम वाढत जावून त्यात जंतू पडले असावेत व नाल्याच्या पाण्यातून निघणे अवघड झाले असावे. त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे. दरम्यान हा वाघ चिंचोणी मारोती मंदिरा जवळ (जुने रिठ )असलेल्या नाल्या शेजारी वन विभागाच्या चौकीदारास निदर्शनास आला.

 

सदरील वाघ हा दोन दिवसापूर्वी मृत्यूमुखी पडल्याने घटनास्थळी दुर्घन्धी पसरली आहे. वनविभागाने तात्काळ पावले उचलत मृत वाघाचा पंचनामा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment