धक्कादायक… चिंचमंडळ येथील शेतकरी पुरात गेला वाहून

 

– पशुधन निघाले सुखरूप 

– दापोरा नजीक उपाशा पुला जवळील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील दापोरा फाट्या समोर असलेल्या उपाश्या पुलाच्या शेजारून पशुधन घेवून शेतात जाणारा शेतकरी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सोमवारला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडल्याने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.

 

मेघश्याम नारायण वासाडे (55) रा. चिंचमंडळ असे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

मागील आठवड्यापासून संततधार सुरु असतांना सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून पूर आलेला आहे.अशातच मेघश्याम वासाडे हे आपले पशुधन घेवून शेतात जात होते.दापोरा फाट्या समोरील उपाश्या पूल प्रसिद्ध आहे.पुलाच्या बाजूने शिवपांदन रस्त्याने पाणी ओलांडून पशुधन घेवून शेतात जात असतांना पाण्याचा प्रवाह सुरु होता. अशातच पशुधन थडी बाहेर निघाले त्यानंतर शेतकरी मागावून निघण्याच्या बेतात पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात वर्धा नदीत गेला असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असून काहीजन शोधण्याचा प्रयत्न करीत असतांना वृत्त लिहीपर्यंत वासाडे यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment