– इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये प्रा. डॉ. पवार नियुक्त
– शैक्षणिक वर्तुळात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
मारेगांव : विटा न्युज नेटवर्क
नुकतेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, न्यू दिल्ली, भारत सरकार यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मेटालर्जी आणि केमेस्ट्री या विषयावर दोन दिवसीय सभा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे सचिव आणि उपसचिव यांच्या प्रमूख उपस्थितीत ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन भारत सरकार न्यू दिल्ली येथे पार पडली.
सदर सभेसाठी स्थानीक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मारेगांव येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. आर. पवार यांची DST स्टेज-3 प्रोग्राम साठी नियुक्ती झाली होती. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, भारत सरकार यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम (IKS) डिवीजन मार्फत नियुक्त मेटालर्जी चे ते मास्टर ट्रेनर आहेत. संपूर्ण भारतातील 16 लक्ष प्राध्यापकांपैकी केवळ 18 प्राध्यापकांची सदर सभेसाठी निवड झाली होती.
आपल्या कर्तुत्व, विषय ज्ञान आणि अचुक अभ्यास च्या जोरावर डॉ. पवार यांनी हा बहुमान मिळविला. त्यांच्यामुळे महाविद्यालयाचा सगळीकडे गौरव होत आहे. सदर महाविद्यालयाचे नावं सुद्धा त्यांच्यामुळे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, न्यू दिल्ली, भारत सरकार च्या वेबसाईट वर कोरण्यात आले आहे. त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल आणि यशाबद्दल प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे, यांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
शेतकरी संस्थेचे अध्यक्ष नानाजी खंडाळकर व्यवस्थापक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्यगण, प्राध्यापक आणि कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे कौतुक केले.