– नवरगाव (धरण )येथील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील नवरगाव येथील विद्युत प्रवाह सुरु करण्यासाठी पोल वर चढलेल्या हेल्पर चा खाली पडून मृत्यू सुरु झाल्याची दुर्देवी घटना आज दि.25 जुलै रोजी सकाळी 9 वाजता घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश नारायण नागपुरे (40) असे पोल वरून पडून मृत्यू झालेल्या लाईनमन हेल्पर चे नाव आहे.
नवरगाव येथील एका घरचा विद्युत प्रवाह बंद होता. तो पूर्ववत सुरु करण्यासाठी गणेश हा पोल वर चढला. चढल्यागत खाली कोसळल्याने डोक्याला जबर मार लागला. मारेगाव रुग्णालयात आणतांना वाटेतच गणेशचा दुर्देवी मृत्यू झाला.गणेश यांचे मुळ गाव मारेगाव असून सासर नवरगाव असल्याने मागील काही वर्षांपासून सासुरवाडी ला वास्तव्य करायचा. वीज कंपनी लाईनमनच्या हाताखाली हेल्पर म्हणून विद्युताचे काम करीत उदरनिर्वाह करायचा.अशातच आज दुर्देवी घटना त्यांच्या वाट्याला आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकाच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुलं आहेत.