चोरट्याचां मोठा डाव फसला…मार्डीत तीन दुकाने फोडली

 

– चोरटे ‘तिसऱ्या डोळ्यात’ कैद 

– चारचाकी वाहन चोरून झाले पसार 

– चोराट्याचां बुलढाणा जिल्ह्यातून चोरप्रवास

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील किराणा दुकान फोडून चोरट्यानीं मार्डी येथे मोर्चा वळवित बाजारपेठेतील मुख्यलाईन मध्ये असलेले तीन दुकान फोडून चोरीचा प्रयत्न केला, मात्र यात फारसे हाती लागले नसल्याने चोरून आणलेले वाहन करंजी उड्डाणपुल खाली ठेवून दुसरे वाहन चोरून नेल्याची घटना २० जुलैच्या पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने व्यापारी वर्गात भितीचे सावट पसरले आहे.

 

मारेगाव येथील गौरव अनंतवार यांचे मार्डी येथील वैष्णवी ज्वेलर्स मधून 2000 रु. रोख , हरीश नागपुरे यांचे गुरुदेव मेडिकल स्टोअर्स यांचे 14000 रु. रोख चोरत मनोहर ठाकरे यांचे साई किराणा या तीन दुकानांना चोरट्यानीं लक्ष करीत फोडले.मात्र फारसे हाती लागले नसल्याने मध्यरात्रीच करंजी गेले. जवळपास पाच जणांचे टोळके असलेले चोरटे सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. करंजी येथील उड्डाण पुलाखाली चोरीत वापरलेले बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील संजय भुसारी यांच्या मालकीची इंडिगो कार चोरी करीत करंजी येथे सोडून दिली, करंजी येथील राजेश बोथरा यांचे मालकीचे बोलेरो वाहन चोरून चोरटे पसार झाले.२० जुलैला पहाटे २.५० ते ३.३० या वेळेत पांढऱ्या रंगाची इंडिगो कार मधूनखाली उतरत चेहऱ्याला बांधलेले चार जण रस्त्यावरून सैरभैर होतांना तर एक जण पांढऱ्या रंगाची कार चालवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहेत.हरीश नागपुरे यांच्या गुरुदेव मेडिकलमध्ये असलेला सिसिटीव्ही कॅमेराचा डीवीआर. चोरट्याकडून फोडण्यात आला. मात्र चोरट्याच्या हाती फारसा मलिदा हाती लागला नसला तरी या घटनेने व्यापारी व नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, पीएसआय. डॉ.डी.जी.सावंत, एएसआय भालचंद्र मांडवकर, रजनीकांत पाटील, अजय वाभीटकर, प्रमोद जिद्देवार, विजय वानखडे अधिक तपास करून चोरट्याचा शोध घेत आहे.

 

चोरट्याचां चोरप्रवास देऊळगावराजा ते मार्डी व्हाया करंजी..!

   बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील संजय भुसारी यांच्या मालकीची इंडिगो कार चोरून चोरटे वणी वरून थेट नांदेपेरा येथे गेलेत. स्टेट बँक शाखेच्या बाजूला असलेले प्रवीण नवले संचालित साईकृपा किराणा दुकान फोडून दुकानातील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारून चोरट्यानीं मार्डी कडे मोर्चा वळविला.मार्डी वरून यवतमाळ हायवे नी टोल नाक्यावरून करंजी उड्डाणंपुलावर पोहचले.सदर इंडिगो वाहन करंजी येथे ठेवून येथीलच राजेश बोथरा यांच्या मालकीचा बोलेरो पिकअप वाहन चोरून चोरट्यानीं पोबारा केला. घटनेच्या पार्श्वभूमीवरून चोरटे हे सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने त्यांना बेड्या ठोकण्यासाठी वणी, मारेगाव व पांढरकवडा पोलीस पथक चहू बाजूने पालथे घालत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment