– बिगर सातबारा संघटनेचा पुढाकार
– आ. बोदकुरवार यांचे लेखी आश्वासन
मारेगाव : दीपक डोहणे
येथील बसस्थानक उभारणीसाठी आजतागायत वेगवेगळ्या संघटनेमार्फत आंदोलन करण्यात आले.मात्र अजूनही हा प्रश्न वांझोटा आहे. आता बिगर शेती संघटनेने उडी घेत बसस्थानक उभारणीसाठी उपोषण सुरु केले. आ. बोदकुरवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत येत्या 15 आँगस्ट पासून बांधकामास प्रारंभ होण्याची लेखीहमी दिल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले.परिणामी, आंदोलनाला आश्वासनाचा बलून कसा फुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न प्रवाशासह जनता केवळ चर्चेतून समाधान व्यक्त करताहेत. बसस्थानकसाठी विविधांगी संघटनेनी पुढाकार घेतला. प्रशासनाने कागदी घोडे नाचवित आजपर्यंत प्रवाशांची बोळवण करण्यात धन्यता मानली. बस थांबा जागा बदलली मात्र प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थे पासून तर ऊन वारा पाऊस झेलत व्यवस्थेची कमजोरी येथे मुकाट्याने सहन करण्याची वेळ उदासीन धोरणाने आणून ठेवली.
मंगळवार पासून नियोजित बसस्थानक प्रांगणात सुरु असलेल्या उपोषण आंदोलनात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट देत स्वहस्ताक्षरात सदर बसस्थानक उभारणीसाठीची निविदा प्रकाशित झाली असून येत्या 15 आँगस्ट पासून वर्क ऑर्डर घेवून कामाला प्रारंभ होण्याचे लेखी आश्वासन सा. बा. विभागाचे कार्यकारी उपभियंता अलचावार यांनी आश्वासित केल्याचे नमूद करण्यात आले.आमदार बोदकूरवार यांनीही स्वातंत्र्य दिना पासून काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनाचा बलून खरंच तरेल काय? की फुटेल? याबाबत प्रवाशांत साशंकता कायम आहे.
बिगर शेती संघटनेचे जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या आंदोलनात देवराव वाडगुरे, किसन गायकवाड, अनिकेत गायकवाड, रामभाऊ जिड्डेवार, पांडुरंग टेकाम, विलास गाताडे, बंडू कोवे आदींनी पुढाकार घेतला.