नाल्याच्या पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून

 

मारेगाव विटा न्युज नेटवर्क

ता. 6 : परिसरातील सिंधी गावानजीक असलेल्या नाल्याला पूर असताना ओलांडताना युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना आज रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली.

मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरामध्ये आज सायंकाळी च्या दरम्यान दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान परिसरातील सिंधी गावा नजीक असलेल्या नाल्याला पूर आला होता. यादरम्यान कुंभा हुन गावाला निघालेला गणेश डाहुले वय 27 वर्ष. रा शिंदी याने नाला ओलडण्याचा प्रयत्न केला असता तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र युवक काही अंतरावर वाहून गेल्यानंतर त्याच्या हाती झाडाची फांदी लागल्याने सुदैवाने बचावला.

मात्र,दुचाकी वाहून गेली. सदर घटनेची माहिती तहसीलदार उत्तम निलावड यांना मिळताच त्यांनी घटना स्थळाला भेट दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment