– भाजपचा पुढाकार : स्थानिक प्रशासनास निवेदन
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
देशाच्या सर्वोच्च सभागृहात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
दि.2 जुलै रोजी लोकसभा सभागृहात हिंदू धर्मीय बाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा भारतीय जनता पार्टीने आरोप करीत स्थानिक पोलीस स्टेशन समोर जाहीर निषेध नोंदविला.
जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात झालेल्या निषेध आंदोलनात विरोधात घोषणाबाजी करून पोलीस व तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष मारोती तुराणकर, प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, विनीत जयस्वाल, राजू मिलमीले यांचेसह मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येनी उपस्थित होते.