मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
कुंभा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथील वृद्धाश्रमातील सेवा धारकाने गड फास लावून आत्महत्या केली. सदरची घटना 13 जून च्या घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजेश पांडुरंग बुरबांधे वय.53 वर्ष, हल्ली मुक्काम कोसारा असे मृतक सेवा धारकाचे नाव आहे. तो मागील तीन महिन्या पूर्वी अष्टेकर वृद्धाश्रमात निशुल्क सेवाधारी म्हणून करीत होता. अशातच काल रात्री त्याने वृद्धाश्रमाच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला गड फास लावून जीवन यात्रा संपविली. याबाबतची फिर्याद रतन जाधव यांनी पोलिसात दाखल केली. याबाबतचा पुढील तर तपास मारे गाव पोलीस करीत आहे.