खळबळजनक…. सिनेस्टाईल पाठलाग करून प्रवासी चालकास रॉडने बेदम मारहान

पोटाला चाकू लावून 21 हजार लुटले : 11 संशायितावर गुन्हे दाखल
– खेकडवाई फाट्यानजीकची घटना

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

पांढरकवडा येथून प्रवासी घेवून निघालेल्या वाहनाचा स्कार्पिओ व दुचाकीने वाहनाने पाठलाग करीत राज्य महामार्गावरील खेकडवाई फाट्यानजीक अडवून चालकासह वाहनाचा ताबा घेत तब्बल अकरा जणांनी घोगुलदरा शिवारात नेवून बेदम मारहाण करीत मोबाईल मधील 18900 व रोख 2000 रुपये लांबविल्याची खळबळजनक घटना शुक्रवारला दुपारी घडली. जखमी फिर्यादीने मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ येथील नरेश जयस्वाल सह दहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रानुसार, पांढरकवडा ते वणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्सीमो वाहनाचा पाठलाग करीत स्कॉर्पिओ व दुचाकी वाहनाने प्रवासी वाहन खेकडवाई फाट्यानजीक चारचाकी वाहनातील नऊ जन व दुचाकीवरील दोघांनी अडवित प्रवाशांना खाली उतरविले.मॅक्सीमो चारचाकी वाहनाचा चालकासह ताबा घेत थेट घोगुलदरा शिवारात नेवून जबर मारहान करीत पोटाला चाकू लावित मोबाईल मधील 18900 रुपये संशायिताने स्वतःचे मोबाईल मध्ये वळते केले. परिणामी खिशातील रोख 2000 रुपये हिसकावून प्रवासी चालकास घाटंजी येथील संशायिताच्या ऑफिस मध्ये नेवून परत बेदम मारहान केली.पोलीस केस कीया तो तेरी खैर नही म्हणत पिडीतास तब्बल दोन तासांनी सोडण्यात आले.बेदम मारहानीत जखमी फिर्यादीस पुढील उपचारार्थ परजिल्ह्यात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, जखमी प्रवासी चालक सलीम सुलतान गिलानी (44) रा. करंजी रोड )यांनी मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रावरुन संशायित आरोपी नरेश जयस्वाल (40)रा.यवतमाळ यांचेसह दहा जणांवर 395, 364 (अ ) 326, 323, 342, 504,506 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांचेसह जमादार अजय वाभीटकर, रजनीकांत पाटील, शंकर बारेकर घटनेचा तपास करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment