– नागपूर ला नेत असतांना वाटेतच घेतला अखेरचा श्वास
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील नगरपंचायत चे वरिष्ठ लिपीक शेख हबीब शेख लाल यांचे आज मंगळवार ला सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 44 होते.
मागील दोन महिन्यापूर्वी पासून त्यांना कावीळ आजाराने कवेत घेतले होते. मधातल्या काळात त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतला मात्र हा आजार त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पसरत गेला. प्रकृती खालावत असतांना त्यांना चार दिवसापूर्वी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने सेवाग्राम येथून नागपूर ला हलवीत असतांना हबीब यांची वाटेतच प्राणज्योत मालविली.
हबीब यांचे पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे. उद्या त्यांचेवर मारेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.