धक्कादायक… मारेगावच्या ग्राहक सेवा केंद्रातून लाखो रुपये गडप

 

-पिडीत लाभार्थ्यांची पोलिसात तक्रार 

-ग्राहक सेवा केंद्राचा गाशा गुंडाळून संशायित पसार 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

आपली रक्कम सुरक्षित राहावी म्हणून नागरिक बँकेत रक्कम जमा ठेवतात मात्र ही रक्कम आता ग्राहक सेवा केंद्रातून परस्पर हडप केल्या गेल्याने लाखो रु. चा फटका दोन ग्राहकांना बसल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या धक्कादायक घटनेने बँक सलग्नित ग्राहक सेवा केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकत ग्राहकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पिडीत लाभार्थी मारेगाव येथील संतोष नामदेव देवढगले असून पानटपरीचा व्यवसाय करीत त्याने स्टेट बँकेत काही रक्कम जमा केली.

 

काही दिवसांपूर्वी रक्कम विड्रॉल साठी स्टेट बँकेत गेला असता संबंधित कर्मचाऱ्याने बँकेत गर्दी करण्यापेक्षा तुम्ही समोरील ग्राहक सेवा केंद्रातून रक्कम काढण्याचे आदेश फर्माविले. त्यानुसार त्यांनी काहीशी रक्कम काढली.दरम्यान, पुन्हा विड्रॉल करिता दृष्टी ग्राहक सेवा केंद्रात गेले असता किमान एक लाख पाच हजार रुपयाची रक्कम सेवा केंद्राचे संगणक चालक सुरज बोढेकर रा. नेत यांनी परस्पर हडप करून अफरातफर केल्याचा पोलिसात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे. परस्पर रक्कम लांबविल्याची व्याप्ती मोठया प्रमाणात असल्याचा कयास असून एका महिलेनेही बोढेकर यांचेविरोधात तक्रार दाखल केली आहे. परिणामी, सदर संशायित संचालक ग्राहक सेवा केंद्राचा गाशा गुंडाळून पसार असल्याची माहिती आहे.

 

या बाबत पिडीतांनी बँकेत विचारणा केली असता व्यवस्थापकाने हात वर केल्याने बँकेच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आपलीच रक्कम सुरक्षित नसल्याने बँकेच्या बेताल कारभारावर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाची चौकशी सुरु असून लवकरच संशायितास हजर करून प्रकरणाचा सकारात्मक छडा लावण्याचा आशावाद पीएसआय डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी “विटा” शी बोलतांना व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment