नैसर्गिक संकटाने केला घात… वीज पडून चार बोकड ठार

 

धानोरा शिवारातील घटना 

– चिंचमंडळ येथील मजुराचे 80 हजाराचे नुकसान

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील धानोरा येथील शिवारात चिंचेच्या झाडाखाली उभे असलेले चार बोकड वर वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार ला दुपारी 3 वाजताचे दरम्यान घडली. या घटनेत पिडीत मजुराचे किमान 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

तालुक्यातील चिंचमंडळ येथील लक्ष्मण लटारी कळसकर यांनी धानोरा शिवारात असलेली नरेंद्र ठाकरे यांची शेती ठेक्याने केली. शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एकूण 13 शेळ्या दुपारी पाळीव शेळ्या उभ्या ठाकल्या. दुपारी अचानक नभ दाटत येत सोसाट्याचा वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरु झाला. अशातच झाडाखाली असलेले एकूण तेरा शेळ्यापैकी नऊ शेळ्यांनी विजेचा कडकडाट पाहून गावाकडील रस्ता पकडला तर चार बोकड हे झाडाखाली उभे असतांना वीज पडून जागीच ठार झाले.मृत्युमुखी पडलेल्या एका बोकड च्या कपाळावर चांद सदृश्य चिन्ह असून त्यास नागपूर येथील एका व्यापाऱ्याने काही दिवसापूर्वी 80 हजार रुपयात हा बोकड मागितला होता मात्र पिडीताने तो दिला नसल्याची माहिती नुकसानग्रस्त मजुराने “विटा” ला दिली.

 

परिणामी, या घटनेची माहिती प्रशासनास अवगत करण्यात आली आहे.नैसर्गिक संकटाने झालेले नुकसानीची भरपाई तात्काळ देण्याची मागणी पिडीत मजुराकडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment