संवेदना…मारेगाव शिक्षिकेची झुंज ठरली अपयशी

 

– उषाताई खैरे यांचे नागपुर येथे निधन

– मार्च मध्ये त्या जळाल्या होत्या

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आयुष्यमती उषाताई खैरे (50) यांचे उपचारदरम्यान नागपूर येथील खासगी दवाखान्यात काल शनिवारला रात्री 8 वाजता निधन झाले.त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मागील 14 मार्च 2024 रोजी घरामागील केरकचरा जाळीत असतांना त्यांच्या कपड्याला अचानक आग लागली. त्यात उषाताई ह्या किमान पन्नास टक्के भाजल्या गेल्या. त्यांचेवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.तब्बल 57 दिवसाची झुंज त्यांची 11 मे रोजी अखेरची ठरली.

त्यांचा मृतदेह मारेगाव स्थित घरकुल कॉलनी निवासी आणण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता उषाताई खैरे यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृतक शिक्षिकेच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment