– मेडिकल पासून अद्यावत सुविधा उपलब्ध
– विविध आजाराचे दहा तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
अलीकडील धकाधकीच्या जीवनात मानवी आजाराचे प्रमाण फुगत असतांना तालुकावासियांना तात्काळ उपचारपद्धती कार्यान्वित करण्यासाठी सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करीत मारेगाव शहरात उद्या दि.11 मे रोजी लोढा हॉस्पिटल व पार्थ मेडिकलचा उदघाटन समारंभ होणार आहे.
जम्बो नियोजित इमारतीत अत्याधुनिक सुविधायुक्त लोढा हॉस्पिटलचे उदघाटन श्री. अमरचंदजी लोढा, श्री. खुशालचंदजी ओस्तवाल, श्री. प्रकाशचंदजी कोचर यांचे हस्ते होणार आहेत.
या खासगी हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशन म्हणून डॉ. राजेंद्र लोढा, प्रसूती स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.सुबोध अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ.पवन राणे, नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.स्वप्नील गोहोकार, दंत रोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, शस्रचिकित्सा तज्ज्ञ डॉ. अक्षय खंडाळकर हे उपचार पद्धती करतील.
गरजू रुग्णांनी अद्यावत सुविधा उपलब्ध असलेल्या लोढा हॉस्पिटल मध्ये लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र लोढा, डॉ. महेंद्र लोढा, दुष्यन्त जयस्वाल, अंकुश माफूर यांनी केले आहे.