– फ्रीज, कुलर,टीव्ही,बल्ब, चार्जरचा लाखो रु. चा फटका
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
विजेचा उच्च दाब वाढल्याने तालुक्यातील भालेवाडी येथील 35 कुटुंबातील घरगुती उपकरणे निकामी झाल्याने लाखो रुपयांचा फटका बसल्याची घटना सोमवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मारेगाव जवळील असलेल्या भालेवाडी येथील शंभर टक्के कोलाम जमातीची लोकवस्ती आहे.सर्वत्र लोकवस्तीत 240 व्होल्टेज विजेचा पुरवठा सुरु होता मात्र वीज पुरवठा करणारा न्यूटल अचानक तुटल्याने विजेचा दाब वाढत थेट 340 पर्यंत गेला. हा विजेचा दाब वाढल्याने भालेवाडी लोकवस्तीतील किमान 35 घरातील टीव्ही, फ्रीज, बल्ब, चार्जर, कुलर उपकरण जळून निकामी झाले.दरम्यान तब्बल तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता.
शेती, मजुरी करणाऱ्या लोकवस्तीत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीने वीज वितरण कंपनी बाबत येथील नागरिकात नाराजीचा सूर आहे.
नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानीबाबत खंत आहे. मात्र नुकसान भरपाई करिता पिडीत नागरिकांनी वीज कंपनीत अर्ज सादर करून सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न असेल
आशिष पवार
कनिष्ठ अभियंता, मारेगाव ग्रामीण