– पीक कर्जासाठी टांगती तलवार
– मारेगाव तालुका सह. संस्था पदाधिकारी तथा संचालक मंडळाचे वरिष्ठाना निवेदन
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
सहकारी संस्थाना 2924-25 या आर्थिक वर्षाचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून प्राप्त झालेल्या धोरणात विविधांगी तृट्या असल्याने शेतकऱ्यांना कर्ज प्राप्ती साठी हे धोरण चुकीचे असल्याचा आरोप करीत यामुळे संस्था कर्जदार शेतकऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.या धोरणाचा फटका बसून शेतकरी पीक कर्जाच्या संभाव्य अडचणीत सापडल्याने याबाबतचे निवेदन मंगळवारला संस्था पदाधिकारी तथा संचालक मंडळाचे वतीने वरिष्ठ प्रशासनास देण्यात आले.
शासनाचे नियमानुसार कर्जाची परतफेड आर्थिक वर्ष पूर्तीत नियमित भरणा करतोय. यातील काही सभासद थकीत असतांना त्यांना जिल्हा बँकेकडून एकमुस्त कर्ज भरण्याची योजना आहे. तशा आशयाचे वाटप सुद्धा गतवर्षाला करण्यात आले. मात्र चालू हंगामात त्यांना वंचित ठेवण्याचे मनसुबे या धोरणात दिसून येत असल्याने सभासदांना पिककर्ज अप्राप्तीची टांगती तलवार उभी ठाकली आहे.
अशा ओटीएस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याऐवजी तात्काळ पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.अलीकडेच शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आला असतांना जिल्हा बँकेचे धोरणाने कर्जदारांना खाईत लोटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. बँकेच्या चुकीच्या धोरणाचा फटका एप्रिल मध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना हमी नसल्याने कर्जदार भरणा करणार नाही पर्यायाने संस्थेचे थकीत चे प्रमाण जम्बो होणार आहे. कर्ज वाटपाच्या जाचक अटी सैल कराव्यात.जिल्हा बँकेने कर्जवाटपाचे धोरण बदलवून कृषी प्रधान देशाच्या पोशिंध्याच्या हिताचा सकारात्मक विचार करून त्यावर अंमल करावा व कर्ज वाटपाची गती वाढवावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका संस्था संचालक मंडळाकडून स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे. तहसील प्रशासनास निवेदन देतांना मारेगाव तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्राम. विविध कार्यकारी सह. संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा बहुसंख्य संचालकांची उपस्थिती होती.