– मारेगाव तालुक्यात महाविकास आघाडी आक्रमक
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
ढगाळी व अकाली पावसाच्या वातावरणात लोकसभा निवडणूकी सह प्रचार तापत असतांना चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार ला चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी आवेशपूर्ण भाषणात मुनगंटीवार यांचा तोल सुटत काँग्रेसवर टीका करतांना व तशा आशयाचा सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल होत असतांना भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर आक्षेपार्ह असे असभ्य भाष्य केल्याचा आरोप करीत मारेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मार्डी चौकात मुनगंटीवार यांचा निषेध नोंदवीत तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी मारेगाव पोलिसात दि. 9 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
सदर व्हिडीओ ने मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा राज्यभर पडसाद उमटत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हे वक्तव्य घृणास्पद असून मणिपूर घटनेनंतर हे वक्तव्य लाज्जास्पद ठरत आहे.तमाम देशातील माय बहिणींच्या व भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने महिला जातीचा कायम अवमान आहे.हे आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करणारी वक्तव्य पंतप्रधान यांच्या समोर केल्याने व अवघ्या देशात लाजिरवाणी तसेच अवमान जनक ठरत असल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतांना करण्यात आले.
मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारी वेळेस याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती अरुणाताई खंडाळकर, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बदकी, अंकुश माफूर, शहर अध्यक्ष समीर सय्यद,सुषमा काळे, शकुंतला वैद्य, माया गाडगे, संगीता वरारकर, बाली कळसकर, मंजुषा मडावी, माला बदकी, बाली कांबळे,माया पेंदोर, नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, उदय रायपुरे, राजू मोरे, खालिद पटेल, पंकज नेहारे, रोशन मोते, संजय शेंडे, पंकज पिदूरकर, शुभम क्षीरसागर, यांच्यासह बहुसंख्य महिलां व पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.