दिलासादायक.. संवेदना जपणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उभारली मारेगावात पाणपोई

 

 – प्रवाशासह शालेय विद्यार्थ्यांना दिलासा

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

एरवी शासकीय कर्मचारी म्हटले की, कार्यालयात येणे ,शासनाने नेमून दिलेली कामे करणे व घरी परतणे हा ठरलेला नित्यक्रम. आपली नोकरी बरी म्हणत कर्मचारी इतर कोणत्याही नवीन उपक्रमाला हात लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात .मात्र संवेदनशीलता जपणारे काही कर्मचारी याला अपवाद आहे. मारेगाव सह ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारे ग्राम विकास अधिकारी विजय उईके, बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक चेतन राठोड, ग्रामसेवक अतुल पाटील, ग्रामसेवक सैय्यद युनूस व ग्रामपंचायत कर्मचारी पोतू आत्राम या कर्मचाऱ्यांना भर उन्हात प्रवासी वाहनाची ताटकळत वाट बघणारे विद्यार्थी , महिला , व प्रवाशांचे होणारे हाल पाहून ग्रीन शेड सह थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारल्याने विद्यार्थ्यासह प्रवाशांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले.

मारेगाव शहरात एका कोपऱ्यात बस थांब्याची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवाशांकरिता ना बसण्याची व्यवस्था. रखरखत्या उन्हात ताटकळत प्रवाशांना उभे राहावे लागते. तर महिला प्रवाशाची मोठी कुचंबना होते. भर उन्हाळ्यात ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. अशी विदारक व भयावह अवस्था आहे. त्यामुळे प्रवासी

वाहनाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय व हाल होत असल्याचे ह्या संवेदनशीलता जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहवले गेले नाही.

प्रवाशांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला.

पुरोगामी विचारसरणीने जगणाऱ्या ह्या कर्मचाऱ्यांनी बस थांब्याची पाहणी केली त्या ठिकाणी मोडकळीच आलेल्या लोखंडे अँगल ला सुव्यवस्थित करून त्यावर ग्रीन शेड टाकले .त्या ठिकाणी अरविंद ठाकरे नामक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले बेंच बसविले. त्यामुळे रखरखत्या उन्हात तात्काळ प्रवासी वाहनाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला. त्याचबरोबर दररोज शेकडो प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दररोज वीस थंडगार पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पाणपोई उभारली.

 

त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या संवेदनशील प्रश्नांकडे जनतेचे हित जपण्याचा उदोउदो करणाऱ्यांचे मन येथे मात्र थिटे पडले. मूलभूत गरजेची उणीव दाखविणाऱ्या राजकीय व सामाजिक चळवळ राबवणाऱ्यांचेही असंवेदशील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment