– मारेगांव न्यायालयाचा निकाल
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतून कर्ज उचल करून भरणा केल्या नसल्याप्रकरणी व धनादेश अनादर झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ होत एका महिलेस मारेगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निकाल देत दोन महिण्याची सजा सुनावली आहे.
दि. ०२/०४/२०२४ रोजी सौ. इंदिरा उईके हिला वि. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मारेगांव श्री. निलेश पी. वासाडे यांनी चेक बाऊन्स मामल्यात दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आणि एकवीरा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मारेगाव ला नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रु. ४५,०००/- देण्याचा निकाल पारित करण्यात आला. आरोपी सौ. इंदिरा उईके हिने फिर्यादी एकविरा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ली. मारेगांव कडून कर्ज घेतले होते. सदर कर्ज फेडण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तिने तिच्या बँक खात्याचा चेक दिला होता. परंतु सदर चेक बाऊन्स झाल्याने फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने मॅनेजर श्री. रामकृष्ण झाडे यांनी न्यायालयात केस दाखल केली.
त्यात आरोपी सौ. इंदिरा उईके हिला न्यायालयाने दोषी धरुन सदर शिक्षा ठोठावली. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने ॲड. पी. एम. पठाण यांनी न्यायालयात बाजु मांडली.