14 एप्रिल…उद्यापासून मारेगावात भीमोत्सव 2024

 – स्पर्धा – आर्केष्टा -व्याख्यान व रॅलीने होणार बाबासाहेबांना अभिवादन 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे तथा आंबेडकरी अनुयायी चे वतीने उद्या दि.11 एप्रिल पासून सलग चार दिवस विविधांगी कार्यक्रमांनी मारेगावात भीमोत्सव 2024 साजरा होणार आहे.

सम्राट अशोका जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती औचित्याने 11एप्रिल रोजी 20 ते 25 वयोगटातील महिलासाठी रांगोळी स्पर्धा, मटकी फोड स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.

12 एप्रिल रोजी संगीत खुर्ची व भीम बुद्ध गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मेडल, मोमेन्टो व प्रशस्तीपत्र 14 एप्रिल रोजी बक्षीसांच्या रूपात देण्यात येणार आहे.

13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यानजिक हिगंणघाटकर भीमोत्सव आर्केष्ट्रा सादर करणार आहे.

14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सामूहिक जाहीर अभिवादन सोहळा. दुपारी 12 वाजता “भारतीय संविधान, लोकशाही व नागरिकांची जबाबदारी” यावर मुंबई येथील प्रमुख वक्ते डॉ. गौतम शिवाजी मोरे हे व्याख्याते आहेत. यावेळी प्रा. डॉ. अनिता कांबळे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक निघणार आहे. सलग चार दिवसीय कार्यक्रमासाठी आयोजन समिती पुढाकार घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment