खळबळजनक…. नवरगाव धरणावर आढळला युवकाचा मृतदेह

 

 – तर्कवितर्कला उधाण

 – मृतका शेजारी स्कुल बॅग अन विषाची बॉटल

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प शेजारी एका विद्यार्थी दशेतल्या युवकाचा मृतदेह आज बुधवारला सकाळी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान मृतका शेजारी स्कुल बॅग, मोबाईल व विषाची बॉटल आणि मोटारसायकल आढळल्याने नेमकी आत्महत्या की घातपात याबाबत वेगवेगळे कयास लावल्या जात आहे.

 

झुडपाणी वेढलेल्या नवरगाव धरणावर प्रेम युगुकांचा प्रणय तास भरत असल्याचे सर्वश्रुत आहे. प्रेमयुगुलांच्या रेलचेलीचा आलेख कमालीचा वाढत असतांना यावर अंकुश लावण्यात प्रशासनास अपयश येत असल्याने जीवघेणे प्रसंग घडते आहे.याचाच परिपाक म्हणून या दुर्देवी घटनेकडे बघितल्या जात आहे.

 

दरम्यान, आज सकाळी धवल रंगाचा जीन्स पॅन्ट व निळा रंग असलेला चेक शर्ट परिधान केलेला किमान 17 वयोगटातील युवकाचा मृतदेह धरण लगत झूडपात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

परिणामी, दुचाकी वाहन स्प्लेंडर क्रमांक एम एच 29 – 3454 मृतकाच्या शेजारी असून सोबत स्कुल बॅग त्यात भूगोल विषयाची पुस्तिका व 52 पत्त्याचा तास आणि मोबाईल सह मोनोसील नामक कीटकनाशक द्रव्याची बॉटल्स आढळली आहे. तूर्तास मृतकाची ओळख पटली नसून ही आत्महत्या की घातपात? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment