शंकरपट नवरगावचा…. लक्षा -फायटर जोडीने पटकविला फायनल

 

– तुळशी देवस्थान यात्रेत तीन दिवस शंकरपटाचा थरार : बघ्यांची तोबा गर्दी 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

4 लक्ष 2 हजाराच्या बक्षीसाची लूट असणाऱ्या मारेगाव तालुक्यातील नवरगाव तुळशीमाता यात्रेत आयोजित सलग तीन दिवसाच्या शंकरपट थरारात अखेरच्या दिवसात हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्षा फायटर बैलजोडीने 8.05 वायुवेगाने अंतर कापत प्रथम क्रमांक पटकाविला.

कुंभा येथील सरपंच, महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा श्री. रंगनाथ स्वामी बँकेचे संचालक अरविंद ठाकरे यांनी केलेल्या शंकरपटाच्या उदघाटन सोहळ्यानंतर या तीन दिवसातील शंकरपटात प्रामुख्याने जनरल गटात शेकडो जोड्या धावल्या.

 

शंकरपटाच्या अखेरच्या दिवसाला साहेबराव पाटील यांच्या लक्षा फायटर नामक जोडीने वायुवेगाने 8.05 सेकंदात अंतर कापत फायनल मध्ये प्रथम विजयाचा मानकरी ठरला. मूर्तिजापूर येथील नाना गोसावी यांच्या वीरा – पक्षा या बैलजोडीने 8.33 चे अंतर कापत दुसऱ्या क्रमांकाचे तर आदासा येथील किशोर कडू यांच्या पक्षा -राणा ही जोडी (8.37) तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.

मारेगाव येथील न्यायाधीश निलेश वासाडे यांच्या हस्ते व सरपंच अरविंद ठाकरे, पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ, विलास नक्षणे, अक्षय ताजने, दादा ठावरी, बदरुद्दीन विराणी, आनंद जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment