धक्कादायक…. मारेगाव तालुक्यातील बालकांना ‘गलगंड’ चा विळखा

 

 – ग्रामिण भागात आजाराचा आकडा फुगतोय

 – पालकात चिंतेचे सावट : आरोग्य यंत्रणा सजग 

मारेगाव : दीपक डोहणे

बदलत्या निसर्गाच्या लपंडावात आजाराचे प्रमाण वाढत आता मारेगाव तालुक्यात गलगंड आजाराने बालकांना कवेत घेत असल्याची धक्कादायक माहिती उजागर होत आहे. या आजारात जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना कवेत घेतल्याने यावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सजग होत थेट शाळेत तपासणी व उपचार सुरु केला आहे.

 

बालकात प्रामुख्याने ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गलगंड आजाराने कवेत घेतले असून व्हायरल असलेल्या आजाराचा मारेगाव तालुक्यात आकडा फुगत रुग्णाची संख्या शेकडो च्या घरात पोहचली आहे.

 

गलगंड आजारात बालकांचे प्रमाण अधिकाधिक असून यात गालावर सूज येणे, जेवण व पाणी पितांना असह्य त्रास होणे, ताप येणे आदी लक्षणे असून तालुक्यातील शेकडो बालके ग्रासत कोमेजले आहे. या आजाराने पालकांत भितीचे सावट पसरले असतांना आरोग्य यंत्रणा सजग होवून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे.

 

गालफुगी नंतर काय करावे

गुळण्या करणे, भरपूर पाणी प्यावे, गलगुंडाला फारसा उपचार नाही. हा आजार लवकर बरा होतो. या आजारामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पेन किलर औषधे तसेच सूज कमी करण्यासाठी व ताप कमी होण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ठराविक औषधी घ्यावी.

 

व्हायरल असल्याने आरोग्य विभागाकडून शाळा तपासणी पथक कार्यान्वित केले आहे.आजतागायत अनेक शाळेत भेटी देवून उपचार आणि मेडिसिन दिल्या गेलेत आहे. शाळा तपासणी व आरोग्य पथक प्रत्येक शाळेत जावून तपासणी करीत आहे.आरोग्य यंत्रणेकडून तपासणीचा रेशो कायम असतांना बालकांनी व पालकांनी घाबरण्याचे कारण नाही.आरोग्य विभाग तत्पर असून व्हायरल असल्याने उपचाराअंती तीन दिवसात हा आजार बरा होतो.

डॉ. अर्चना देठे

 तालुका आरोग्य अधिकारी

          मारेगाव

 

मी सामाजिक दायित्व स्वीकारून गावात फोफावलेल्या आजाराची तालुका प्रशासकीय अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटीत माहिती दिली. प्रशासनाने तात्काळ आजारी बालके व पालकांना चिंतामुक्त करावे ही माफक अपेक्षा आहे.

          दिवाकर सातपुते

         पिडीत पालक, चिंचमंडळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment