दिलासादायक :अखेर तो आदेश रद्द..  शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने भरावे लागेल पीक कर्ज

 

– विटा न्यूज नेटवर्कचा इंफॅक्ट 

– शिवसेना (उबाठा) चेही आंदोलन

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

चालू पीक कर्जावर सहा टक्के दराने व्याज आकारून वसुली करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी व्हीसीच्या माध्यमातून बँकांना दिले होते. याबाबतचे वृत्त दिनांक 18 फेब्रुवारी रोजी “विदर्भ टाईम्स” न्यूज मध्ये प्रकाशित होताच शिवसेना(उबाठा) चे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात या आदेशाविरुद्ध तीव्र आंदोलन करून आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. 14 मार्च रोजी सदर आदेश रद्द केल्याबाबतचे आदेश सहकार आयुक्त यांनी काढले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून नावलौकिक प्राप्त आहे. शेतकरी हीत जोपासण्याकरिता बँक नेहमीच तत्पर असते. त्यामुळे जिल्हा बँकेचे जाळे जिल्हा भर पसरलेले आहे. जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात ९५ शाखा कार्यरत आहे या शाखेंतर्गत 930 च्या आसपास विविध सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नाबार्ड मार्फत लाखो शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पीक कर्जाचा मोठा आधार होतो.

मात्र,13 फेब्रुवारी रोजी सहकार आयुकांनी व्हीसीच्या माध्यमातून जिल्हा बँकांना आदेश दिले की, सन 2023 – 24 चे पीक कर्ज वसूल करतांना सहा टक्के व्याजदर आकारून वसुली करावी. त्यामुळे बँकांनी तसे आदेश काढून सर्व सोसायटी सचिव व बँक व्यवस्थापकांना आदेश पाठविले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असल्याबाबतचे वृत्त 18 फेब्रुवारी रोजी विटा न्यूज मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जावर द्यावे लागेल सहा टक्के व्याज ह्या मधल्या खाली प्रकाशित होताच शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले होते. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले होते.याबाबतचे निवेदन महसूल प्रशासनामार्फत शासनास पाठविण्यात आले. 14 मार्च रोजी सहकार आयुक्त व सर व्यवस्थापक नाबार्ड यांच्या उपस्थितीत झालेल्या व्हीसी मध्ये संबंधित अन्यायकारक आदेश मागे घेण्यात आला.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने पीक कर्ज भरावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.

व्याज परत मिळणार

ज्या शेतकरी सभासदांनी आदेशानंतर पीक कर्ज भरले असेल व त्यांच्याकडून सहा टक्के दराने व्याजाची वसुली केली गेली असेल अशा शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम लवकरच परत करण्यात येण्याबाबत चे परिपत्रक काढले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment