मारेगावात कौतुक… पवित्र रमजानचा पहिला रोजा आठ वर्षीय बालकांकडून दाखल

 

 – पुष्पहार घालून ठरत आहे अभिनंदनास पात्र

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

यावर्षीच्या 12 तारखेपासून सुरु झालेल्या पवित्र रमजानचा पहिला रोजा कडक उन्हात मारेगाव येथील आठ वर्षीय बालकाने सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निरंकारात कृतीत उतरविला.त्याचे स्थानिक मस्जिद मध्ये पुष्पहार घालून अभिनंदन करीत शहरात सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

येथील प्रभाग क्रमांक 16 मधील अवघ्या आठ वर्षीय हारीश खॉन अहमद खॉन पठाण असे निरंकार रोजा दाखल केलेल्या बालकाचे नाव आहे.

गत 12 तारखेपासून मुस्लिम धार्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला. इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला अनण्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत केली जातात व मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास ) पाळले जातात.

याच पवित्र महिन्यात हारीश बालकाने निरंकार रोजा ठेवत सर्वांचे लक्ष वेधत कौतुकास पात्र ठरला आहे.समाज बांधवांकडून त्यास पुष्पहार अर्पण करीत अभिनंदन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment