– मैत्री कट्टा ग्रुपचा पुढाकार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत येथील मैत्री कट्टा ग्रुपचे वतीने सन्मान स्त्री शक्तीचा.. जागर कर्तृत्वाचा ! कार्यक्रम सलग तीन दिवस आयोजित करण्यात आला.
यात ८ मार्च रोजी शुक्रवारी प्रसिद्धीच्या प्रवाह नसलेल्या परंतु सकारात्मक कार्य करणाऱ्या ६०० महीलांना साडी चोळी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंचावर सत्कार डी. एम.पोल्हे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव समारंभ पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शुंभागी मुंघाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद डोहणे यांनी मानले.
जागर कर्तृत्वाचा… कार्यक्रमास लक्षणीय महिलांची उपस्थिती लक्षात घेता व त्याच दिवशी महाशिवरात्री सण असल्यामुळे महीलांचे उपवास असतात हे लक्षात घेऊन सर्व भगिनींसाठी मुस्लिम बांधवांनी साबुदाणा खिचडी फराळाचे आयोजन केले होते .सदर आयोजन समीर सय्यद या युवा सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वात समस्त मुस्लिम बांधवांनी वर्गणी एकत्र करून कार्यक्रमाचे आयोजन केले.
स्त्री सन्मान शोभायात्रा
९ मार्च शनिवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन विविध राज्यांतील लोकनृत्य सादर करीत शोभायात्रा काढण्यात आली.कार्यक्रम प्रारंभ सौ.किरन देरकर (भारतीय नारी सन्मान ने सन्मानित) व सौ.संध्या पोटे यांनी फुगे उडवुन करण्यात आले.
नृत्य स्पर्धा
१० मार्च ला३० वर्षा वरील महिलांसाठी समुह व एकल नृत्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर तर श्री संजय भाऊ खाड़े, शामा दिदी तोटावार,यांच्या उपस्थितीत करण्यात आले . समुह नृत्य स्पर्धेत प्रथम ऐ गिरी नंदिनी.. या गीतावरील नृत्याला अंबे गृप, मारो दूध पडो वे देवे.. या गीतावरील राजस्थानी नृत्याला आम्रपाली ग्रुप ला द्वितीय तर शिव शिव शंकर हर हर शंकर.. या गीतावरील नृत्याला तृतीय जिल्हा परिषद शिक्षक गृपने तृतीय पारितोषिक पटकाविले.
एकल नृत्य स्पर्धेत प्रथम मेघा मड़ावी द्वितीय रचना किनाके तृतीय प्रियंका घाने आली. डॉ विनोद आदे ,कु शुभांगी मुंघाटे,समीर सय्यद यांचा यावेळी गौरव करण्यात आला.