– मारेगाव तहसीलदार सह आता वणीचं पथक राहणार दिमतीला
– दापोरा फाट्यानजीक मध्यरात्री कारवाई
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव तहसीलदार सातत्याने वाळू तस्करांच्या धडाकेबाज कारवाईचा रेशो कायम ठेवत गुरुवार ला मध्यरात्री 2 वाजता रॉयल्टी नसलेला हायवा वाहन वाळू भरून जात असतांना मारेगाव सह वणी पथकाने जप्तीची कारवाई केली.सदर कारवाई मार्डी खैरी रस्त्यालगत असलेल्या दापोरा फाट्याजवळ करण्यात आली.
तालुक्यातील कोसारा रेती घाटातून विना परवाना वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. मारेगाव तहसीलदार यांनी अँक्शन मोड वर चा रेशो कायम ठेवत आजतागायत अनेक वाळू चोरट्या तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
तस्कर हे दंड व कारवाईला न जुमानता वाळूची तस्करी तहसीलदार यांचे लोकेशन घेत मध्यरात्रीचा डाव साधत आहे. मात्र तस्करांच्या चोरट्या वाहतुकीला मारेगाव महसूल विभाग करड्या नजरेने बघत हमखास लगाम लावत कारवाईचा बडगा उगारत आहे. आजवर लाखो रुपयांची चोरटी वाळू पकडण्यात नियोजन पद्धतीने तहसीलदार निलावाड यांना यश आले. तहसील प्रांगणात वाळू तस्करांचे विविध वाहने जप्तीत असून यातून करोडो रुपयांचा दंड शासनाला प्राप्त होणार आहे.
कारवाईचे सातत्य असतांना वाळू तस्करांच्या मुजोऱ्या मात्र जप्ती अन दंडास पात्र ठरत आहे. तहसीलदार यांच्या सुनियोजित नियोजनाचा ट्रॅक्टर धारकांनी तालुक्यात कमालीचा धसका घेतला आहे तर हायवा धारक यांच्या मुजोऱ्या अंगलट येत आहे.यातून राजकीय व सामाजिक चळवळीचा ‘आव’ येथे थिटे पडत असल्याचे चित्र समझने वालो को “ईशारा” ठरत आहे.
दरम्यान, ही मध्यरात्रीची कारवाई वणी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले , वणी तहसीलदार निखिल धुरधर, मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पार पाडली. यापुढे हे अधिकारी घाट पालथे घालत व कारवाईसाठी वणी अधिकारी व प्रशासन मारेगाव पथकाच्या दिमतीला असणार असल्याने वाळू तस्करांना हा पुन्हा गर्भीत इशारा आर्थिक कंबरडे मोडण्यास पुरेसा ठरणार आहे एवढे मात्र निश्चित.