– तीन अंकी तुफान विनोदी नाटक
– नाट्य परंपरेला मारेगाव तालुक्यात पुन्हा उजाळा
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्याला सांस्कृतीक वारसा लाभला असतांना मध्यंतरीच्या काळात सांस्कृतीक पोकळी निर्माण झाली. मात्र ही पोकळी भरून काढण्यासाठी आता मारेगाव तालुक्यातील नाट्य कलाकारांनी कला क्षेत्राची पुन्हा मोट बांधत खास रसिकांना नाट्य पर्वणीचा नजराना खुल्या रंगमंचावर बहाल करणार आहे. दि.10 मार्च रोजी नवरगाव (धरण) येथे “अस्सा नवरा नको गं बाई” या नाटकाच्या रूपात!
मराठी नाटकाची सुरुवात तालुक्यात झाली असली तरी मारेगाव तालुक्यातील नाटकाच्या परंपरेला पुन्हा उजाळा देण्यासाठी व आजच्या तरुण पिढीला उत्तमोत्तम संगीत नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी गत वर्षांपासून प्रारंभ केलेल्या ‘सदूचं लग्न’ हे नाटक सुप्पर हिट झाल्यानंतर अँड. महेमूद खॉन दिग्दर्शित, विदर्भातील प्रसिद्ध नाट्य लेखक सदानंद बोरकर यांचे “अस्सा नवरा नको गं बाई ” हे तुफान विनोदी नाटक तालुक्यातील नवरगाव येथील शिवप्रेमी ग्रुप व समस्त गावकरी यांच्या वतीने आयोजित रविवार दि.10 मार्च रोजी रात्री 8 वाजता रसिक श्रोत्यांसाठी सांस्कृतीक मेजवानी ठरणार आहे.
विनामूल्य असलेल्या तीन अंकी नाटकात प्राचार्य हेमंत चौधरी, रमाकांत लखमापुरे, गुलशेर पठाण, अनिलकुमार सोनवणे, समाधान भगत, आयशा खॉन, सौ. सुवर्णा नरांजे, प्रणाली घुंगरुड व अँड. महेमूद खॉन हे नाट्यकलावंत असणार आहे.तमाम संगीत रसिकांनी या नाट्य प्रयोगाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.