शेतकऱ्यांचा मारेगावात आक्रोश… पीक कर्जावर लादलेले व्याज दर रद्द करा : अन्यथा….?

 

– हजारो शेतकऱ्यांची जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात प्रशासनावर धडक

– मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याची विद्यमान सरकार कडून गळचेपी सुरु असतांना भरीसभर म्हणून पीक कर्जावर लादलेले व्याज दराचे भूत पुन्हा मानगुटीवर बसविले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट होत आत्महत्येचे भयाण पावले उचलण्यात येत असल्याची विदारक स्थिती असतांना या संवेदनशील व इतर मागण्या घेवून हजारो शेतकरी शिवसेना (उबाठा ) वणी विधानसभा क्षेत्राचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात प्रशासनासमोर एल्गार पुकारत निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा यावेळी मारेगाव तहसील प्रशासनास देण्यात आला.

चालू हंगामात काळ्या आईला हिरवा शालू पांघरण्यासाठी व आगामी काळातील उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी बिन व्याजी कर्जाची उचल करीत नियोजन करीत असतें मात्र यंदा सहा टक्के व्याज दर लादून शेतकऱ्यांचा तोंडावर काळे फासण्याचा डाव आखण्यात आल्याने शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.पीक कर्जाची रक्कम आजतागायत पदरी पडली नाही, कर्जमाफी चा प्रश्न ऐरणीवर, 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान रखडले असतांना घरकुल कामे रेती अभावी फुलस्टॉप वर आहे.

शेतकरी तथा सर्वासामान्य जनता या संवेदनशील प्रश्नाच्या गर्तेत खितपत अडकला असतांना याची तात्काळ पूर्तता करण्यासाठी शिवसेना (उबाठा ) पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्राचे कार्यवाहक नेते, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात आणि माजी जि. प. सदस्य अनिल देरकर, सोसायटीचे अध्यक्ष गजानन किन्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मारेगाव तहसील प्रशासनास शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देत सकारात्मक पूर्ततेची मागणी रेटून धरली. मागणीची पूर्तता न झाल्यास उपविभागातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा यावेळी ईशारा देण्यात आला.यावेळी तालुक्यातील प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment