– मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे शासनाच्या प्रधान सचिवांना आदेश
– महत्वपूर्ण निर्णयाकडे खिळल्या अवघ्या मारेगावकरांच्या नजरा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले बहुचर्चित नगरसेवक यावर कारवाईसाठी हायकोर्टात अपीलानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने कारवाईसाठी शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवास आदेश निर्गमित केले. बहुचर्चित प्रकरण व नगरसेवकांच्या कारवाईकडे अवघ्या मारेगाव वासिंयांच्या नजरा खिळल्या आहे.
मारेगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक अनिल उत्तम गेडाम यांनी लाच मागितल्या प्रकरणी न्यायामूर्ती अशोक घरोटे व न्यायामूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली.मारेगाव येथील अँड. महेमूद खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली.
दरम्यान, गेडाम हे नगरसेवक झाल्यानंतर येथील एका दारू दुकान हटविण्यासाठीची त्यांची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल 90 हजार रुपयांची लाच घेतांना अलगद अडकले.मात्र स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करिता भोपळा दाखविण्यात आला होता.त्यांच्या गैरवर्तणुकीने अँड महेमूद खान व इतर नागरिकांनी मुख्याधिकारी यांना अर्ज दिला. यावर कारवाईसाठी हा अर्ज शासनाकडे पाठविण्यात आला.शासनाने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना गेडाम यांचा अहवाल मागविला. येथेही प्रकरण थंडबस्त्यात असतांना याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईची मागणी केली.
बहुचर्चित नगरसेवक गेडाम यांचेवर उच्च न्यायालयाने चालू आठवड्यात कारवाई करावी असे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आल्याने मारेगाव नगरसेवकावर कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे.या निर्णयाकडे अवघ्या मारेगाव तालुकावासियांच्या नजरा खिळल्या असून सदर प्रकरणी याचिकाकर्त्याकडून अँड. तेजस देशपांडे यांनी बाजू मांडली.