– प्रजासत्ताक दिनानिमित्त वकील संघ तर्फे सांस्कृतिक सोहळा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय मध्ये प्रजासत्ताक दिनी ‘अस्सा नवरा नको ग बाई’ हे तीन अंकी तुफान विनोदी नाटक सादर करण्यात आले. रसिकांनी या नाटकात प्रचंड प्रतिसाद दिला.
येथील न्यायालयात २६ जानेवारीला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून केळापुर न्यायालयाचे वरीष्ठ दिवाणी न्यायधीश डॉ. टि. एन. कादरी, न्यायाधीश स्नेहा कुलकर्णी, मारेगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड.एन.एस. हुसेनी, सचिव ऍड.परवेज पठाण, ऍड.क्रीष्टणा मुत्यालवार, ऍड. गजानन खैरकार उपस्थित होते.
यावेळी नृत्य,गायन यास उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली. अस्सा नवरा नको ग बाई या नाटकाने रसिकांना पोट धरून हसायला लावले.शिकण्याची प्रचंड तळमळ असणाऱ्या मुलीस अशिक्षित बापाने लग्न करण्याचा तगादा लावणे. त्यासाठी शेती विकण्याचा प्रयत्न, आई समान शेती विकून लग्न करण्याच्या दुखं, यातून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, दुसऱ्या पळून गेलेल्या मुलीच्या नवऱ्याचा धिंगाणा, या कथानकात प्रेक्षक कधी धीरगंभीर तर कधी पोट धरून हसले.
या नाटकात सशक्त अभिनयन, उत्कृष्ट नेपथ्य, कथानकाला अनुरूप संगीत यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. सदानंद बोरकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन ऍड. मेहमूद पठाण यांनी केले. विशेष म्हणजे यात वकील मंडळी आणि न्यायालय कर्मचारी व इतर यांनी भूमिका निभावल्या.
नाटक मध्ये गुलशेर पठाण,प्रणाली घुंगरुळ,बेलीफ समाधान भगत, सुवर्णा नरांजे,ऍड.मेहमूद पठाण, प्राचार्य हेमंत चौधरी, सहायक अधीक्षक रमाकांत लखमापूरे, अनिल सोनवणे,पूजा चौधरी, यांनी भूमिका केल्या. नेपथ्य व संगितची बाजू जफर खान यांनी सांभाळली.
सहाय्यक भूमिकेत मोरेश्वर कनकुंटवार, मोसिम शेख, चेतन गेडाम, नंदू झोडे,संजय मेश्राम,बेलीफ महेंद्र पुरी यांनी काम केले.
यावेळी नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती.
कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी सर्व वकील मंडळी, न्यायालय कर्मचारी, आणि विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.