वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या.. दोन ट्रॅक्टरवर महसूल पथकाची जप्तीची कारवाई

 

तहसीलदार व पथकांची सतर्कता 

– कारवाईसाठी वडकी पोलीसही सरसावले 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या कोसारा गावाजवळ तहसीलदारांनी दोन वाळूचे अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. तर एक ट्रॅक्टर घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाले. सदरची कारवाई 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

तालुक्यातील कोसारा घाटावर गेल्या अनेक वर्षापासून वाळू माफियांच्या नजरा खीळल्या आहे. यात अनेकांनी चांगलीच माया गोळा केली . मात्र मागील काही दिवसापासून महसूल विभाग ॲक्शन मोडवर आल्याने सतत कारवाईचा बडगा उगारत असताना मालामाल झालेले मात्र अवैध उत्खनन करीत तस्करी जोमाने करीत आहे. यात काही राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. मात्र तहसीलदार उत्तम निलावाड निर्भीडपणे तस्करांचे कबंरडे मोडत आहे. अशातच आज कोसारा परिसरात तीन ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे आढळले. यात दोन ट्रॅक्टर वर जातीची कारवाई करण्यात आली तर एक ट्रॅक्टर पळून जाण्यास यशस्वी झाला. सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड ,मंडळ अधिकारी शिंगणे, मंडळ अधिकारी अमोल घुगाने, तलाठी विवेक सोयाम, तलाठी सनदेवल कुडमेथे यांनी केली.

महसूल विभाग पथकाने वाळू तस्करांचे कंबरडे मोडण्याचा रेशो कायम ठेवत आज पुन्हा दोन वाळू भरलेल्या ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई सोईट कोसारा रस्त्यालगत बुधवारला संध्याकाळी सहा वाजता केली.

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील रेती घाटातील चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी ट्रॅक्टरने दिवसाढवळ्या सुरु होती.ही बाब महसूल पथक तालुक्यात कार्यान्वित असतांना हा चोरटा प्रकार उजेडात आला. थेट वाळू भरलेल्या दोन ट्रॅक्टर रस्त्याने जात असतांना ही जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई साठी वडकी पोलीस पथक यांनाही पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, सदरील वाळू चोरटे ट्रॅक्टर मारेगाव तहसील कार्यालयात आणण्यात आले असून हे ट्रॅक्टर मारेगाव तालुक्यातील कोसारा व राळेगाव तालुक्यातील खैरी येथील असल्याचे कळते.

परिणामी, मारेगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार गिरीष बोरडे, तलाठी एस. सी. कुडमेथे, विवेश सोयाम, विकास मडावी, घुगाने व वडकी येथील ठाणेदार महाले व पथकाने ही कारवाई केल्याने वाळू तस्करांच्या दहशतीत भर पडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment