– यमुनाताई दारुंडे यांचे निधन
– उद्या होणार अंत्यसंस्कार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येथील चोखाजी गॅस एजन्सीचे राजू उर्फ धम्मपाल दारुंडे यांच्या मातोश्री यमुनाताई चोखाजी दारुंडे (72) यांचे आज बुधवार ला सुभाष नगर येथील स्वगृही निधन झाले.
यमुनाताई दारुंडे यांना गेल्या चार दिवसापूर्वी डोक्याला अर्धांगवायुचा तीव्र झटका मारला गेला. तात्काळ त्यांना चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी हलविण्याचा सल्ला दिला.आज बुधवार दुपारी त्यांना प्राणवायूवर आणण्यात येवून निवासी ठेवण्यात आले मात्र अखेर दुपारी 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई,नातवंड असा आप्तपरिवार आहे.
उद्या गुरुवार ला सकाळी 10 वाजता त्यांचेवर यवतमाळ रोड वरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.