मार्डीत आजपासून खेळाडूंचे अस्तित्व पणाला…. पुरुष-महिलांच्या कबड्डीचे खुले सामने

 

– तीन लाखाच्या बक्षीसांची भव्य लूट

– न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाचा पुढाकार

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मैदानी खेळाच्या माध्यमातून शारीरिक व्यायाम, शारीरिक हालचाली होत असल्याने कबड्डी खेळाला फार महत्व आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य आत्मसात करण्यासाठी व राष्ट्रीय पटलावर आपले नाव कोरण्यासाठी मार्डी येथे भव्य पुरुष आणि महिलांचे खुले कबड्डी स्पर्धाचे आज बुधवार पासून आयोजन करण्यात आले आहे.

 

स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन मार्डीचे सरपंच रविराज चंदनखेडे यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान माजी आमदार वामनराव कासावर हे भूषवतील तर ज्येष्ठ नेते नानाजी खंडाळकर, नरेंद्र ठाकरे यांच्या सह अरुणाताई खंडाळकर, राकेश खुराणा, आशिष खुलसंगे, गौरीशंकर खुराणा, हबीब खॉ पठाण, अरविंद ठाकरे, देविदास बोबडे शांतीलाल दुगड यांचेसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

सदर सामने पुरुषांच्या अ व ब गटात असणार आहे. महिला स्पर्धाकांसाठी अ गट असणार आहे. महिलांचे सामने उदघाटन दिनी खेळविण्यात येणार आहे.यासाठी जवळपास अडीच लाखांच्या रोख रकमेत बक्षीसांची लयलूट असणार आहे.यासह चषक, सायकल, गिफ्ट हॅम्पर व प्रोत्साहन बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

 

सदरील सामन्यात तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment