– दंगलकार श्री. नितीन चंदनशिवे
-मारेगाव स्नेहसंमेलनात मार्गदर्शन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वतंत्र विचार मांडणाऱ्या व कृतीशील माणसांचं योगदान मोठे आहे त्यात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. या महामानवांनी केवळ विचाराची मांडणीच केली नाही तर ते आपल्या कृतीतून जन माणसांच्या मनात पेरले त्यांच्या विचारातूनच महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचा पाया मजबूत बनला. असे विचार दंगलकार श्री नितीन चंदनशिवे यांनी मांडले.
स्थानिक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.दिनांक 23 /1 /20२४ रोजी मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय जीवन कापसे उपस्थित होते. हिरमुसलेल्या चेहऱ्यांना उजाळा देण्याची काम वार्षिक स्नेहसंमेलन करते, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाला आगळीवेगळी ओळख मिळते, विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे असे संमेलने झाली पाहिजे असे विचार त्यांनी याप्रसंगी मांडले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नानाजी खंडाळकर यांच्या शुभहस्ते झाले.
संविधान हा मानवी विकास साधणारा पवित्र ग्रंथ आहे त्यात कर्तव्य व अधिकारांचा सुंदर संयोग झाला आहे. त्याचे रक्षण करणे काळाची गरज आहे असे आपल्या विचारातून शेतकरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय सुधीर भाऊ दामले यांनी व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचे आकर्षण ठरले ते मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक, संमेलनात मान्यवरांच्या व विद्यार्थी वर्गाच्या समोर विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर मल्लखांबाच्या खेळाचे प्रतिनिधित्व करणारे महाविद्यालयाचे खेळाडू किसन प्रजापती व मनोज राठोड यांनी आपले मलखंबाचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यांनी डॉक्टर नितीन राऊत यांचे मार्गदर्शनात हे प्रात्यक्षिक सादर केले. उद्घाटन सोहळ्यात शेतकरी शिक्षण संस्थेतर्फे माननीय प्रा.श्री चिंतामणराव कोंगरे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, डॉ. एन.आर.पवार व डॉ. विनोद आदे यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले कला, क्रीडा साहित्य व विचारांचा महा कुंभ म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय. चिंतामणराव कोंगरे यांनी महाविद्यालय भविष्यात अनेक क्षेत्रात उंच भरारी घेईल असा आशावाद आपल्या भाषणातून व्यक्त केला.तर आशिष खुलसंगे यांनी विद्यार्थी हा समाजाचा आरसा व उद्याचे देशाचे भविष्य आहे असे मत मांडले. याप्रसंगी शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक श्री नरेंद्र ठाकरे , संचालक वाहेद अली, सहसचिव अँड.भास्कर ढवस, संचालक गजानन पाटील खापणे, श्बोढाले सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी तर कु. आचल किन्हेकार व शाम ठाकरे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी डॉ.श्रीराम खाडे , प्रा.आवारी मॅडम, प्रा. अनुप कुरेकर सर, प्रा. विजय भगत, डॉ.संतोष गायकवाड, प्रा.बाळासाहेब देशमुख, डॉ.विभा घोडखांदे, डॉ. प्रदीप माकडे, प्रा स्नेहल भांदककर यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गजानन सोडनर यांनी केले तर आभार प्रा. शैलेश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे प्रयत्न केले.