ब्रेकिंग…. 9 ब्रॉस वाळू असलेल्या “आयवा” च्या मुसक्या आवळल्या

 

तहसीलदार निलावाड यांची ‘अँक्शन मोड’ टू बी कंटीन्यूव्ह 

– महसूल पथकाची मार्डी रोडवर मध्यरात्री जप्तीची कारवाई

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

वाळू तस्करीसाठी मार्डी परिसर चर्चेत असतांना त्याचे लोन आता मारेगावात पसरले आहे. कोसारा घाटातून चोरी केलेली वाळू चक्क आयवा वाहनातून आणत असताना महसूल विभागाने छापा टाकत वाहन जप्त केले. ही कारवाई महसूल विभागाने गुरुवारच्या मध्यरात्री मार्डी रोडवरील भालेवाडी फाट्यानजिक केली. तहसीलदार निलावाड यांच्या पारदर्शक अँक्शन मोडणे वाळू तस्करांचे पुरते कंबरडे मोडले आहे.

 

कोसारा येथील वाळू घाट बंद असतांना चक्क 9 ब्रास वाळूचा आयवा वाहन क्रमांक MH 34 A V0079 मार्डी मार्गे मारेगाव दिशेने गुरुवारला मध्यरात्री वाळू तस्करी सुरु असतांना महसूल विभाग 24 तास अँक्शन मोडवर असतांना छापा टाकत जप्तीची कारवाई करण्यात आली.तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तलाठी विवेश सोयाम, एस. सी. कुडमेथे, गजानन वानखेडे, मंगेश बोपचे, विजय कनाके यांनी ही कारवाई केली.

 

मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटातून वाळू तस्करांच्या गोरखधंद्यावर सातत्याने तहसीलदार उत्तम निलावाड कारवाई करीत असतांना तस्करांच्या मुजोऱ्या सर्वश्रुत आहे. मागील दोन महिन्यापासूनच्या महसूल विभागाच्या धडक कारवाईने अनेक तस्करांचे कंबरडे मोडून गुन्हे दाखल झाले आहे. बहुतांश तस्कर राजकीय आधार घेत या गोरखधंद्याला खतपाणी घालण्याचा घाट रचत असतांना तहसीलदार मात्र तस्करांचे मनसुबे हाणून पाडत आहे. किंबहुना प्रशासकीय कर्तव्यात पारदर्शकतेचा परिचय तहसीलदार उत्तम निलावाड यांचेकडून देण्यात येते असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment