– गंभीर जखमींना चंद्रपूर हलविले
– जखमीत दोन बालके व तीन महिलांचा समावेश
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथून चंद्रपूर जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक देत रस्त्याच्या कडेला फरफटत कारचा चेंदामेंदा करीत झालेल्या अपघातात कार मधील एकाचा घटना स्थळी मृत्यू तरी सहा जन जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजताचे दरम्यान वणी मारेगाव रोड वरील निंबाळा नजिक घडली.
मारेगाव येथील शेख परिवार चंद्रपूर येथे एका कार्यक्रमास अर्टिका क्रमांक MH 13 डे 7906 ने जात असतांना निंबाळा फाटा चे अलीकडे समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या दहा चाकी ट्रक क्रं M H 34 BG 1337 ने अर्टिका कारला जबर धडक देत रस्त्याच्या कडेला जवळपास 25 फूट फरफटत नेले.
कार चालवीत असलेले शेख नवाज शेख मुजफ्फर (28) रा. मारेगाव हे जागीच ठार झाले.झेबा शेख बरकत (25), हाजरा शेख मुजफ्फर (60), हसनेन शेख बरकत (4), अहमान शेख बरकत (दीड वर्ष ), कमर सय्यद (38) हे सर्व मारेगाव व आलिया शेख (15)रा. मार्डी हे अपघातात जखमी झाले.जखमींना वणी येथे दाखल करण्यात आले असून यातील दोघांना चंद्रपूरला हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की कार चा समोरील भाग चक्काचूर झाला. चालक शेख नवाज बराच वेळ कार मध्ये फसून होते.जेसीबी मशीन च्या सहाय्याने कार सरळ करून चालकास बाहेर काढण्यात आले.